माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Monday, 7 December 2020
Friday, 23 October 2020
विशेष लेख:
रूपगुणसंपन्न पण दुर्दैवी अभिनेत्री..रंजना!
![]() |
| लोभस सौन्दर्यवती रंजना! |
१९८० च्या दशकात मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर लोभस सौन्दर्य नि बहारदार अभिनय असणारी सुपरस्टार होती..रंजना! माझी त्या काळातील आवडती अभिनेत्री!
![]() |
| 'झुंज' (१९७७) चित्रपटात रंजना! |
प्रसिद्ध अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी! तिच्या बरोबर आई वत्सला देखमुख सुद्धा चित्रपटात काम करायची. स्वाभाविकपणे बालवयातच रंजना पडद्यावर चमकली. १९६३ चा तो हिंदी चित्रपट होता 'हरिश्चंद्र तारामती'! त्यानंतर ख्यातनाम चित्रकर्ते व्ही. शांताराम यांनी १९६६ मध्ये हिंदी-मराठी दोन्ही भाषेत निर्मिलेल्या 'लडकी संह्याद्री की' चित्रपटात तिने छोटी भूमिका रंगवली. याची नायिका तिची मावशी संध्या होती. तिची आई सुद्धा यात होती, पण आपल्या मुलीने या क्षेत्रात येऊ नये असा त्यांचा कटाक्ष होता! त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करून रंजनाने 'रुईया महाविद्यालयातून 'तत्वज्ञान व साहित्य' यामध्ये पदवी संपादन केली!
![]() |
| 'चानी' (१९७७) चित्रपटात रुपेरी केस नि गौर कांतीची रंजना! |
![]() |
| 'सुशीला' (१९७८) चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत रंजना! |
![]() |
| 'अरे संसार संसार' (१९८०) चित्रपटात रंजना व कुलदीप पवार! |
![]() |
| 'गोंधळात गोंधळ' (१९८१) चित्रपटात रंजना व अशोक सराफ! |
![]() |
| 'सुशीला' (१९७८) चित्रपटात दुसऱ्या बेदरकार भूमिकेत रंजना! |
![]() |
| अखेर 'फक्त एकदाच' नाटकात रंजना! |
रंजनास मी प्रथम पाहिले-भेटलो तेंव्हा चित्रपट पत्रकारितेत यायचो होतो. पुण्यात 'विजय टॉकीज' मध्ये 'गोंधळात गोंधळ' चित्रपटाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर च्या उपस्थितीत झाला आणि त्यास मी गेलो होतो..आणि तिथे तिला प्रथम पाहिले. मला आठवते तेंव्हा ती शेजारी बसलेल्या अशोक सराफ ला सांगत होती की 'शशी कपूर ला जाऊन नमस्कार कर!'
चित्रपट पत्रकारितेत आल्यावर रंजनाची भेट झाली. पुण्यात 'फक्त एकदाच' या तिच्या नाटकाचा तो प्रयोग..प्रियकराने कठीण प्रसंगी साथ सोडलेल्या स्त्रीची व्यथा त्यात तिने (स्वाभाविकपणे) व्यक्त केली. त्या प्रयोगानंतर मी तिला भेटायला स्टेजवर गेलो..तर पडदा पडूनही ती त्या भूमिकेत अत्यंत भावुक होऊन बसली होती! मी पुढे गेलो आणि नमस्कार करीत त्या मनस्थितीत तिच्याशी दोन शब्द बोललो "हृदय हेलावलं रंजनाजी!" तिचे डोळे पाणावले होते..आमच्या हातांचे भावनिक स्पर्श झाले!
रंजनाला जाऊन आता वीस वर्षे झाली!..पण अजूनही तिची ती शेवटची भेट आठवली की मला गहिवरून येते!!
- मनोज कुलकर्णी
Tuesday, 20 October 2020
भावांजली!!!
कल्याण च्या साहित्य विश्वात अनेक वर्षे कार्यरत असलेले आणि 'काव्य किरण मंडळा'चे अध्यक्ष किरण जोगळेकर यांचे परवा दुःखद निधन झाल्याचे कळाले!
कविता आणि वैचारिक लेखनाची त्यांची जवळपास ७५ पुस्तके प्रकाशित झाली होती. साहित्य संमेलनासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असे!
२००४ मध्ये माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकास पहिल्यांदा त्यांच्याच 'साहित्य विचार मंथन' संस्थे कडून गौरविण्यात आले. त्यानंतर आमचे संबंध वृद्धिंगत होत गेले!
त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
Saturday, 17 October 2020
स्मिताचा कॅमेरा आय!
आपली प्रतिभासंपन्न अभिनेत्री स्मिता पाटील एक उत्तम दिग्दर्शिका झाली असती!
अतिशय मनस्वी नि संवेदनशील असणाऱ्या तिची फोटोग्राफ़ी सुद्धा पाहण्याजोगी होती. समाज वास्तव ती बोलकेपणाने कॅमेऱ्यात टिपत असे.
दिग्दर्शिका म्हणून सामाजिक, वास्तववादी चित्रपट तिने असेच प्रभावी रीतीने चित्रित केले असते..आणि त्यांतून स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली असती!
तिचा पुत्र-अभिनेता प्रतिक बब्बर ने शेयर केलेले हे दुर्मिळ छायाचित्र आढळल्यावर या विचाराने मन हेलावले!
आज तिच्या जन्मदिनी व्यक्त केलेली ही रुखरुख!
सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 7 October 2020
एक्सक्लुजिव्ह लेख!!
'स्टुडिओ सिस्टीम'..शिस्त व जिव्हाळा!
![]() |
| पुणे येथे सुप्रसिद्ध 'प्रभात फिल्म कंपनी' ची उभारणी होत असताना! |
बदलत्या काळानुसार 'स्टुडिओ सिस्टिम' इतिहास जमा झाली! चित्रपट विस्तारत गेला आणि तो इनडोअरच्या सेट्स द्वारे उभारलेल्या कृत्रिम दृश्य निर्मितीतून बाहेर आला.. आवश्यक असणारी सृष्टी मधील प्रत्यक्ष दृश्ये चित्रित करण्यासाठी आऊटडोअर चित्रण होऊ लागले!
![]() |
| कलकत्त्ता येथील नामांकित 'न्यू थिएटर्स' स्टुडिओ. |
![]() |
भालजी पेंढारकर यांचा कोल्हापूरचा प्रसिद्ध 'जयप्रभा स्टुडिओ'! |
राज कपूर चा मुंबई मधील 'आरके स्टुडिओ'!
|
तसेच भालजी पेंढारकर यांनी आपल्या 'वाल्मिकी' (१९४६) चित्रपटात काम केल्याबद्दल पृथ्वीराज कपूर यांना मुंबईतली त्यांची काही जमीन बहाल केली नि पुढे त्यावर राज कपूर ने आपला 'आरके स्टुडिओ' उभारला!' त्यासंदर्भात एक आठवण चित्रपट इतिहासकार स्नेही इसाक मुजावर यांनी नमूद केली होती की..'बऱ्याच वर्षांनी राज कपूर जेंव्हा आपल्या सत्कारानिमित्त कोल्हापुरात आला होता, तेंव्हा "मामा" भालजींना भेटण्यासाठी त्यांच्या 'जयप्रभा स्टुडिओ' त गेला. त्या दुपारच्या वेळी ते झोपले होते. तेंव्हा त्यांची देखभाल करणारा नोकर म्हणाला की "बाबा झोपलेत आणि त्यांना उठवता येणार नाही!" मग त्यांची भेट न होता राज कपूर परतला! ही निष्ठा होती. बाबांच्या कडक शिस्तित तयार झालेले दिग्गज कलाकार सुद्धा त्यांच्या कलेशी समर्पित आठवणी सांगत!
![]() |
हिमांशु राय यांच्या 'बॉम्बे टॉकीज'चा बोर्ड! |
![]() |
| पुणे येथे 'प्रभात फिल्म स्टुडिओ' च्या जागी उभी राहिलेली 'फ़िल्म इन्स्टिटयूट'! |
आता 'सध्याच्या परिस्थितीमुळे भविष्यातला चित्रपट वेगळा असेल' असे सुतोवाच सुधीर मिश्रा सारख्या दिग्दर्शकांनी केले आहे. काय सांगावे, बाह्य चित्रीकरणास मर्यादा आल्यास पुन्हा स्टुडिओत चित्रपट निर्मिती व्हायला लागेल!..एकूणच चित्रपटाची परिभाषा बदलून, त्याचे प्रदर्शनही काही अनोखे असेल!!
- मनोज कुलकर्णी
मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या त्या तीनही भाषांमध्ये काही त्रुटी आणि व्यक्त होण्याच्या मर्यादाही आहेत. मराठी मध्ये आता अन्य (म्हणजे फ़ारसी, इंग्रजी व कानड़ी सुद्धा) शब्द इतके रूढ़ झालेत की त्यांसाठी मूळ मराठी शब्द शोधावे लागतील आणि सापडले तरी ते वापरले जातीलच असे नाही; किंबहुना ते हास्यास्पद ठरतील! तर हिंदी मध्ये सरलेल्या दिवसाला 'कल' आणि येणाऱ्या दिवसालाही 'कल' हाच शब्द वापरला जातो. तर अगदी शुद्ध हिंदी शब्द हे बऱ्याच अंशी संस्कृतकडूनच आलेले आहेत..उदा. प्रायः! इंग्रजी बाबत बोलायचे तर 'आदरार्थी बहुवचन' त्यात नाही. मान्यवर व्यक्तीस 'ही', 'शी' संबोधले जाते आणि कुत्रा, मांजर यांनाही! या तुलनेत 'अदब' हा मुळातच उर्दू भाषेचा स्थायीभाव आहे आणि त्यानुसार 'आप' ह्याच शब्दाने त्यांत संवाद सुरु होतो!
आता साहित्य निर्मितीबाबत नमूद करायचे तर 'करुण रस' हा मराठी गद्यामध्ये अधिक दिसून येतो आणि त्या तुलनेत दर्जेदार श्रृंगार रस अल्प प्रमाणात आढळतो. 'विडंबन' हा काव्य प्रकार इथे पार दिग्गजांनी सुरु केला, म्हणजे एखाद्याच्या साहित्याची टर उडवणेच; तर विनोदी साहित्य सुद्धा बऱ्याच अंशी या भाषेतील म्हणीप्रमाणेच 'टवाळा आवडे विनोद'! हिंदीत अलंकारिक शब्दरचना फारश्या न आढळता 'आम' भाषा आढळते; पण त्यांतही प्रांताप्रमाणे (उ.प्र., म.प्र. व बिहार) बदलत जाणाऱ्या बोली भाषेचे प्रतिनिधित्व फारसे आढळत नाही, तर (साचेबद्ध) विशुद्ध हिंदी दिसते! इंग्रजी तर (साहित्यनिर्मितीपेक्षा) जास्त करुन वसाहतवादासाठीची व्यवसायाभिमुख असल्यासारखी वाटते. वाइल्ड सारखे दिग्गजही याद्वारे आपले तत्वज्ञन मांडताना आपले ठोकताळे बिंबवताना जाणवतात!
नाट्यासारख्या अन्य साहित्य प्रकारात सुद्धा मराठीत ('लाडक्या व्यक्तिमत्वां'सकट अन्यही दिग्गज नावाजलेल्यांनी) अन्य कृतींवर आधारित वा अनुवादित केलेले दिसते! तर हिंदीत जननाट्य स्वरुपात हा प्रकार प्रत्यक्ष लोकांत जाऊन केलेला आढळतो! इंग्रजीत शेक्सपिअर सारखे नाट्यदिग्गज मानतो, पण त्यांच्या साहित्य प्रकारात 'सत्तेसाठी कुरघोड़ी, संधिसाधू व्यक्तिरेखा व प्रेमाच्या शोकांतिका' अधिक दिसतात. त्यांच्या रोमियोने जिथे जूलिएट तीच पूर्व दिशा व तिला सूर्य संबोधले! (म्हणजे इथे पुन्हा आम्ही म्हणू ती पूर्व दिशा हा इंग्रजी बाणा होताच असे म्हंटले तर वावगे ठरू नये!) वास्तविक ते मला भावले! तर अस्सल फ़ारसी वा उर्दू नाट्याविष्कार हे आपल्या बोलपटांस पूरक ठरल्याचे दिसते!
आता पुनःश्च 'उत्कट प्रेमकाव्य प्रकारा' बाबत असे की, मराठीत ते तेवढे तरल श्रृंगारिक आढळत नाही; तर हिंदीत त्यानुसार फारसा अलंकारिक फुलोरा नसल्याने (उर्दू शब्दांची मधे पाखरण नसेल तर) सरधोपट व्यक्त झालेले वाटते! इंग्रजी मध्ये अगदी वर्डस्वर्थ सारखे दिग्गज रोमॅंटिक कवी झाले, पण त्यांचे आविष्कार हे सर्वसामान्यांच्या भावनांपर्यंत किती पोहोचले असतील शंका आहे. प्रेमिकेसाठी शेक्सपिअरने सूर्याची उपमा दिली. या तुलनेत उर्दूतील प्रणयाराधनेत प्रेमिकेस नेहमी चंद्राची (शीतल सौंदर्याची) उपमा दिलेली आढळते..आणि रूमानी शायरांनी तिला "दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क़ का शबाब' संबोधले!
एकूण ह्या भाषांच्या बाबत असे वाटते की, कुणी 'रांगड़ी भाषा' संबोधल्याने, तर कुणी राजकीय फायद्यासाठी 'अस्मिता' केल्याने मराठीत (नकळत) माज आणला गेला. तर तिच्या संवर्धनासाठी मागे एका संस्थेने "शिव्याही द्या पण मराठीत!" असे घोषवाक्यही पुढे केले. यातून कुठल्या दर्ज्याचा विचार ते कळते! त्यांना असे का नाही वाटले लिहावे "दोन शब्द प्रेमाचे बोला पण मराठीत!" तर हिंदीला 'बम्बैय्या टपोरी' बोलीने खराब केले. तरी हिंदी सिनेमाने तारलेय! इंग्रजीत मुळातच एक कोरडेपणा नि परकेपणा जाणवतो. तरीही त्यात बोलले-लिहिले म्हणजे 'उच्छभ्रू' असा भ्रम झाल्याने (वसाहतवादी इंग्रज गेले तरी) ती आपले अवास्तव 'स्टेटस' राखुन आहे. मग काही 'अहंकारी लेखक' बोजड इंग्रजी शब्द वापरत, आंतरराष्ट्रीय लेखक होण्याची धडपड करीत बसतात!
शेवटी काय आहे की..जी भाषा भावते वा आपल्या प्रकृतीला पूरक वाटते..त्यात व्यक्त होणे आपल्याला आवडते! मला मातृभाषा मराठी बाबत आदर आहे आणि तिची भाषा भगिनी हिंदीचा सुद्धा! पण माझ्या रूमानी मिज़ाज नुसार व्यक्त होण्यासाठी माझी पसंती 'उर्दू' असते! (रोमॅंटिक 'फ्रेंच' ही मला आवडते!)..राष्ट्रभाषा हिंदीचा उर्दूशी मिलाप करुन मी लिहित असतो!
- मनोज कुलकर्णी
संस्कृत नंतर उर्दू मध्येच उत्कट प्रेमकाव्य!
कालिदास यांच्या सारखे आद्य संस्कृत कवि इतक्या उच्च प्रतीच्या प्रणयी भावना व्यक्त करतात, इतकी सुंदर रुपके वापरतात हे अचंबित करते! त्याचा प्रभाव मराठी काव्यसंपदेवर फारसा दिसून येत नाही. हिंदीतही बहुतांश अवास्तव लांबण लावल्या सारखे आढळते तर (फारशी साहित्याची नसलेली) इंग्रजी त्यामध्ये फार कमी पड़ते!
त्या तुलनेत उर्दू काव्यात प्रणयी भावना अधिक उत्कटपणे आणि समृद्ध शब्द-भाषा शैलीत व्यक्त झालेली प्रकर्षाने जाणवते!
मराठीतील अर्वाचिन प्रेमकाव्ये ही बऱ्याचदा उथळ जाणवतात..आणि नव कवी तर काय उगाच तावच्या ताव भरत बसतात. किती
कमीत कमी शब्दांत नि ओळींत आशयघन भाव उत्कटपणे व्यक्त व्हायला हवा. रुबाई सारख्या कवितेच्या प्रकारांत हे प्रभावीपणे आढळते आणि यांत उर्दू भाषा अव्वल ठरते!
- मनोज कुलकर्णी
![]() |
| 'धाकटी बहीण' (१९७०) चित्रपटातील या प्रेमगीतात लोभस सौन्दर्यवती अनुपमा. |
शब्दरूप आले मुक्या भावनांना."
माझ्या मोजक्या आवडत्या मराठी प्रेमगीतांपैकी हे एक!
![]() |
| या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त! |
याचे दिग्दर्शक राजदत्त असल्याने निसर्ग सान्निध्यात रममाण प्रेमिकांवर त्यांनी चित्रित केले आहे. या आधी 'मधुचंद्र' (१९६७) ह्या त्यांच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटापासून दत्ताजींची ही खासियत! त्यात पण काशिनाथ घाणेकर आणि उमा ह्या प्रेमिकांवर त्यांनीं "सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले.." हे प्रेमगीत असेच निसर्गाच्या कुशित चित्रित केले होते. ते ही माझे आवडते!
आता पन्नास वर्षांचा कालावधी या गीतास लोटला आहे..पण त्यातील प्रेमभावना आणि अनुपमा आजही हृदयाचा ठाव घेते!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 4 October 2020
जेंव्हा पडद्यावरचे आणि वास्तवातले मुख्यमंत्री भेटतांत!
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ तडफदार अभिनय व खर्जातील आवाज याने गाजवणारे अरुण सरनाईक यांचा आज ८५ वा जन्मदिन!
आपल्या रौप्यमहोत्सवी अभिनय-कला कारकिर्दीत ग्रामीण, शहरी व सामाजिक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्टपूर्ण ठरल्या!
यांत समांतर चित्रकर्ते डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मधील त्यांची भूमिका लक्षवेधी नि महत्वाची होती. अरुण साधू यांच्या त्याच शीर्षकाच्या व 'मुंबई दिनांक' ह्या कादंबरींवर हा चित्रपट आधारित होता. यात मुख्यमंत्र्यांची भूमिका अरुण सरनाईक यांनी बेमालूमपणे साकारली होती!
![]() |
| तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील! |
पुढे लवकरच चित्रपट पत्रकारितेत आल्यावर अरुण सरनाईक यांना भेटण्याची संधी मला मिळाली..त्यात त्यांच्या अभिनयाची तारीफ केल्यावरचे त्यांचे ते खर्ज्यातील हसणे आजही आठवते!
ह्या दोघांस ही आदरांजली.!!
- मनोज कुलकर्णी
गेले काही महिने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पौराणिक मालिकांचा अंमल आहे आणि गेली काही वर्षे मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपटांचे जणू पेव फुटलेय!
वास्तविक पाहता वर्तमान परिस्थितीत इतक्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत..त्याकडे ह्या मालिका-चित्रपट वाल्यांचे लक्ष कसे जात नाही याचे नवल वाटते! जनसामान्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. हे सामाजिक वास्तव पडद्यावर आणावे असे का नाही वाटत यांना?
सर्वपरिचित बाळबोध रंजन किती करत बसणार अन पुराण-इतिहास तरी तथ्यांसह समोर येऊ शकतो का?..त्यापेक्षा समकालिन वास्तवदर्शी चित्रपट सादर करुन संवेदनशीलता व कलाकारांस असणारी सामाजिक बांधिलकी तरी दर्शवावी!
- मनोज कुलकर्णी
अशी मराठी नाट्य संस्कृती!
आदर्शवादी प्राध्यापक आणि बिघडलेला विद्यार्थी यांच्या आयुष्यात नियतीने घडवलेले बदल हे याचे कथा सूत्र होते! यांत पणशीकरांनी स्वाभाविकपणे प्रा. विद्यानंद आणि.. काशिनाथ घाणेकर यांनी अफलातूनरित्या विद्यार्थी लाल्या अशा प्रमुख भूमिका रंगवल्या!
अशीच मराठी संस्कृती जपणारी त्यांची ही दुर्मिळ छायाचित्रे..
(बाजूचे) भारतीय बैठक नि ताटांसमोर रांगोळ्या काढलेल्या अशा पंगतीत जेवतांना यांतील चित्तरंजन कोल्हटकर सारखे कलावंत आणि पणशीकर व घाणेकर!..कदाचित पंतांनी "वदनि कवळ घेता.." सुद्धा म्हंटले असेल!
आपली नाट्यसृष्टी प्रत्यक्ष अनुभवलेल्या जुन्या लोकांकडून ऐकलेल्या त्या संस्कृतीचं प्रत्यंतर अशा छायाचित्रांनी येते!
- मनोज कुलकर्णी
Saturday, 3 October 2020
आपल्या महाराष्ट्राची दोन क्षेत्रांतील ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्वे..
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर..
त्यांच्या अनोख्या भेटीचे हे छायाचित्र गदिमांच्या १०१ व्या जयंती प्रसंगी आढळले!
"अजब तुझे सरकार.." गीत लिहिणाऱ्या गदिमांनी या भेटीत सर्वसाधारण राजकारण्यांवर कदाचित काही मार्मिक टिपणी केली असेल असे यातून दिसते! अर्थात यात दिलखुलास हसणारे चव्हाण साहेबही साहित्याची विलक्षण जाण असणारे रसिक होते! गदिमाही तेंव्हा विधान परिषदेवर आमदार होते!
ह्या दोघांस विनम्र अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी
![]() |
| 'जैत रे जैत' च्या संगीत चर्चेत हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर व स्वतः गोनीदां! |
यावर्षी प्रख्यात रसिक साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या साहित्यकृतींवर निघालेल्या अभिजात मराठी चित्रपटांचे स्मरण झाले!
ह्या दोन्ही चित्रपटांतील प्रमुख व्यक्तिरेखां प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या बंडखोर होत्या. ज्या अनुक्रमे सूर्यकांत आणि स्मिता पाटील यांनी जीव ओतून साकारल्या होत्या!
गोनीदां यांच्या साहित्यकृती वरील ही आणखी एक श्रेष्ठ चित्रकृती.. 'देवकीनंदन गोपाला' (१९७७). राजदत्त दिग्दर्शित ह्या चित्रपटात श्रीराम लागू यांनी गाडगेबाबांची भूमिका अप्रतिम साकारली होती.
- मनोज कुलकर्णी






































