Sunday, 9 August 2026

 
मातेच्या छत्रछायेत बहरलेले बालपण
त्या सुवर्णक्षणांची आता हृद्य आठवण

आई 🙏🥀

- मनोज

Saturday, 8 August 2026


मातेच्या वात्सल्यातील बाल्य ते
आता आठवणे असे साश्रू नयने!


आई, तुझ्या विना हे जिणं कठीणच!

- मनोज

Wednesday, 5 August 2026

मातृछत्र हरपले!

माझी आई 'आदर्श शिक्षिका' सरोज श्री. कुलकर्णी (वय ८२ वर्षे) हिचे नुकतेच १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले!

तिचे संपूर्ण आयुष्य म्हणजे दिव्यत्वाची प्रचितीच..
खडतर बालपण, लहान वयात लग्न नि एकत्र कुटुंबाचा भार. यांत अनेक कष्ट, दुःखे सोसत सर्वांसाठी जणू झिजणे. परिवाराची धार्मिक कार्ये व्रतस्थपणे करीत राहणे. तरीही शिक्षणाने उत्कर्ष.
'डी.एड'. ते अगदी 'हिंदी पंडिता' पर्यंत! पुढे शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द. यांत सहृदय, संवेदनशील. 'आदर्श शिक्षिका' म्हणून गौरव!

निर्मळ, भावूक, हळवे मन. नातीगोती सांभाळीत, आपल्या उत्तम स्वयंपाकाने सरबराई करणे. गायन, बागकाम यांत रुची. कलासक्त राहून रसिकताही जोपासणे आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे. 'सर्वांशी चांगले वागण्याचे' संस्कारी सांगणे! माया, करुणामय अशी वात्सल्यमूर्तीच होती ती!!

आमच्या कुटुंबियांवर अनंत उपकार असणाऱ्या, अशा माझ्या थोर मातेस अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली!!!

- मनोज कुलकर्णी