Wednesday 4 April 2018

'शेजारी' चित्रपटाचे रंगीत पोस्टर..यात प्रमुख  
गजानन जहागिरदार व केशवराव दाते 
आणि चंद्रकांत व जयश्री!

'प्रभात'ची श्रेष्ठ सामाजिक चित्रकृती..'शेजारी'.


'प्रभात फिल्म क.' ने १९४१ मध्ये तत्कालिन सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने निर्माण केलेला चित्रपट 'शेजारी'..त्यास ७५ वर्षे होऊन गेल्यावरही आज तितकाच समकालिन आहे.

व्ही. शांताराम दिग्दर्शित 'शेजारी' या चित्रपटात श्रेष्ठ कलाकार केशवराव दाते व गजानन जहागिरदार यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि त्यांनी त्या अप्रतिम वठवल्या.  या चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'पडोसी' मध्येही जहागिरदार त्याच भूमिकेत चमकले; तर त्यांच्या बरोबर मझहर खान होते!..जहागिरदार यांची १११ वी जयंती नुकतीच झाली!
'शेजारी' चित्रपटाच्या शेवटच्या धरणफुटीच्या प्रसंगात  
श्रेष्ठ कलाकार केशवराव दाते व गजानन जहागिरदार!









या चित्रपटाचे एस. फत्तेलाल यांचे कला-दिग्दर्शन ही वाखाणण्यासारखे होते..मुख्यत्वे शेवटचा धरणफुटीचा प्रसंग त्यांच्या कौशल्याने अतिशय वेधक झाला होता! 
व्ही. दामले यांनी या चित्रपटाचे ध्वनिमुद्रण केले होते; 
तर व्ही. अवधूत यांचे कल्पक छायाचित्रण होते!

या श्रेष्ठ चित्रकृतीस व या सर्व 'प्रभात'कारांना मानाचा मुजरा!!

- मनोज कुलकर्णी 
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment