माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Thursday, 27 February 2020
Monday, 10 February 2020
Thursday, 19 December 2019
बुद्धिप्रामाण्यवादी नटश्रेष्ठ डॉ. लागू!
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांतील मनस्वी कलावंत डॉ. श्रीराम लागू यांचे अखेर परवा वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले!![]() |
| रंगभूमीवरचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू! |
वैद्यकीय क्षेत्राकडे पाठ फिरवून १९६९ मध्ये कानेटकरांच्या नाटकाद्वारे डॉ. लागूंनी अभिनय क्षेत्रात स्वतःला जणू झोकून दिले! जवळ जवळ अर्धशतक सुमारे २० नाटकांतुन आणि २५० हुन अधिक चित्रपटांतुन त्यांनी भूमिका केल्या. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती व इंग्रजी अशा भाषेच्या सीमा ओलांडत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दर्शवली!
![]() |
| व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) चित्रपटात निळु फुले, संध्या व डॉ. श्रीराम लागू! |
रंगभूमीवर डॉ. लागूंनी तशा सर्वच भूमिका समरसून केल्या. त्यांत.. शिरवाडकरांचा 'नटसम्राट' आणि सॉक्रेटिस वरील 'सूर्य पाहिलेला माणूस' ह्या व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयातील उत्तुंगता सिद्ध करणाऱ्या ठरल्या!
१९७२ ला प्रदर्शित झालेल्या शांतारामबापूंच्या 'पिंजरा' ने डॉ. लागूंची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली...
'दी ब्ल्यू एंजल' (१९३०) या पहिल्या गाजलेल्या जर्मन बोलपटावर बेतलेल्या 'पिंजरा' मधील नर्तकी संध्या बरोबर त्यांची नैतिक अधःपतन होणाऱ्या मास्तराची भूमिका तशी आव्हानात्मक होती!
![]() |
| 'सामना' (१९७४) चित्रपटांत डॉ. श्रीराम लागू व निळु फुले! |
त्यानंतर 'सामना' (१९७४) आणि 'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेलांच्या राजकीय थरारपट समजल्या गेलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या लक्षवेधी होत्या.
एकीकडे ग्रामीण राजकारणाची लक्तरं - काढणारा बेरकी मास्तर; तर दुसरीकडे - मुत्सद्दी मंत्री अशा परस्पर विरोधी भूमिका त्यांनी अनुक्रमे यांतुन बेमालूमपणे वठवल्या!
दरम्यान 'घरौंदा' सारख्या चित्रपटांतुन हिंदी मधुनही डॉ. लागू भूमिका करू लागले होते. प्रख्यात जपानी चित्रकर्ते अकिरा कुरोसवा यांच्या 'हाय अँड लो' (१९६३) या चित्रपटावर आधारित राज सिप्पीच्या 'इन्कार' (१९७७)..
या बॉलीवुड रिमेक मधील त्यांची भूमिका.. उल्लेखनीय होती. नंतर राजेश खन्नाचा 'थोडी सी बेवफ़ाई' (१९८०) आणि अमिताभ बच्चनचा 'लावारिस' (१९८९) अशा आघाडीच्या नायकांबरोबरच्या चित्रपटांतून त्यांनी काम केले!
![]() |
| 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चित्रपटात गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू! |
'झाकोळ' (१९८०) या एकमेव चित्रपटाचे.. दिग्दर्शन लागूंनी केले. याद्वारे त्यांच्याबरोबर तनुजा यांनी हिंदीत काम केले; तर पुढे नावा - रूपास आलेल्या उर्मिला मातोंडकरने बाल - कलाकार म्हणून यातून पडद्यावर पदार्पण केले!
'देवकी नंदन गोपाला' (१९७७) या राजदत्त - दिग्दर्शित चित्रपटातील गाडगेबाबांची त्यांनी केलेली भूमिका ही त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत होती..हे मी त्यांच्याशी वार्तालापात नमूद केले होते..तेंव्हा त्यांनी त्यास दुजोरा दिला होता!
नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले! अखेरच्या काळात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतुन त्यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. तर 'लमाण' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!
तरीही रंगमंचावर त्यांचे विलक्षण प्रेम होते..पण अखेर जीवनाच्या रंगभूमीवरून त्यांना एक्झिट घ्यावी लागली!
त्यांच्या स्मृतिस ही आदरांजली!!
- मनोज कुलकर्णी
Saturday, 26 October 2019
वडिलांस भावपूर्ण श्रद्धांजली!!
आमचे वडिल लेखक श्रीविलास कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले!
'पुणे महानगरपालिके'तुन अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या आमच्या वडिलांचे लेखन क्षेत्रांतही योगदान होते.
त्यांच्या साहित्य संपदेत अद्भुतरम्य साहस कथा आणि वैचारिक लेखनाचा समावेश होता. एकीकडे 'नीलमणी आणि पिवळा जादूगार', 'न हसणारी राजकन्या', 'गाणारा पक्षी', 'गुलसनोबर' सारख्या बालकथा; तर दुसरीकडे 'गौतम बुद्ध: जीवन आणि बोधकथा' व 'धर्म आणि राष्ट्रवाद' सारखी विचार मंथन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली!
'रहस्य रंजन', 'रम्यकथा', 'बुआ', 'महाराष्ट्र' व 'माणूस' सारख्या नियतकालिकांतुन त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर 'सुदर्शन' मासिक' व 'सा. अखंड भारत' यांच्या संपादकीय विभागांत त्यांनी कामही केले होते.
तर 'मेघदूत' या एकेकाळच्या लोकप्रिय मासिकाचे ते संपादक होते!
'पुणे महानगरपालिके'च्या 'नागरी जीवन' या नियतकालिकास त्यांचे संपादन सहाय्य असे. सेवानिवृत्ति नंतर अलिकडेच त्यांची 'माझी मुक्तफुले' हा गद्य-काव्य संग्रह आणि 'बालोद्यान' ही पुस्तके प्रकाशित झाली होती.
माझ्या चित्रपट पत्रकारितेस त्यांचे प्रोत्साहन होते!
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो!!
- मनोज कुलकर्णी
Friday, 27 September 2019
Friday, 26 July 2019
सहकार अग्रणी व स्मिता पिता!
![]() |
| स्मिता पाटीलने माता-पिता यांच्यासह साजऱ्या केलेल्या (अखेरच्या) वाढदिवस प्रसंगी शिवाजीराव पाटील! |
सहकार क्षेत्रातील अग्रणी, माजी खासदार, राज्यमंत्री
आणि दिवंगत प्रतिभाशाली अभिनेत्री स्मिता पाटीलचे वडील श्री. शिवाजीराव पाटील यांचा दुसरा स्मृतिदिन अलिकडेच होऊन गेला!
ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि साखर कारखान्यांच्या सहकार क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते!
| 'पिफ्फ' मध्ये शिवाजीराव पाटील यांस माझा भेटण्याचा क्षण! |
दोन वर्षांपूर्वी 'पिफ्फ' मध्ये स्मिता पाटीलच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या दृकश्राव्य कार्यक्रमास शिवाजीराव पाटील यांची खास उपस्थिती होती. त्यावेळी तिचे धीरगंभीर अभिनय आविष्कार पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते..!
तो संक्रांतीचा दिवस असल्याने तिळगुळ घेऊन त्यांस नमस्कार केला आणि माझा 'चित्रसृष्टी' नववास्तववादी चित्रपट विशेषांक त्यांस भेट दिला..त्याचे त्यांनी कौतुक केले!
ती भेट शेवटची ठरली!..त्यांस विनम्र आदरांजली!!
- मनोज कुलकर्णी
- मनोज कुलकर्णी
Thursday, 11 July 2019
तेंडुलकर परंपरेची अखेर!
![]() |
| मंगेश तेंडुलकर यांचे पुस्तक. |
![]() |
| लेखक विजय तेंडुलकर. |
ते मार्मिक लेखनही करीत. तसेच नाटक हा सुद्धा त्यांचा आवडीचा विषय असल्याने त्याची विविधांगी समीक्षा करीत!
'संडे मूड' हा
त्यांचा (व्यंगचित्रांसह) लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना
'महाराष्ट्र साहित्य परिषदे' चा 'चि. वि. जोशी पुरस्कार' मिळाला!
त्यांच्या जाण्याने तेंडुलकर परंपरेची अखेर झाली आहे असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधु व परखड लेखक-पटकथाकार विजय तेंडुलकर गेले आणि ('रजनी' प्रसिद्ध) संवेदनशील अभिनेत्री पुतणी प्रिया तेंडुलकरही हुरहूर लावून गेली!
या तिघांसही वेगवेगळ्या प्रसंगी नि कार्यक्रमांतून भेटण्याचा व बोलण्याचा
योग मला आला आणि त्यांतून त्यांचे प्रागतिक विचारही जाणून घेता आले!
मंगेश तेंडुलकरजींस माझी विनम्र श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
![]() |
| संवेदनशील अभिनेत्री प्रिया तेंडुलकर! |
त्यांच्या जाण्याने तेंडुलकर परंपरेची अखेर झाली आहे असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधु व परखड लेखक-पटकथाकार विजय तेंडुलकर गेले आणि ('रजनी' प्रसिद्ध) संवेदनशील अभिनेत्री पुतणी प्रिया तेंडुलकरही हुरहूर लावून गेली!
या तिघांसही वेगवेगळ्या प्रसंगी नि कार्यक्रमांतून भेटण्याचा व बोलण्याचा
योग मला आला आणि त्यांतून त्यांचे प्रागतिक विचारही जाणून घेता आले!
मंगेश तेंडुलकरजींस माझी विनम्र श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 10 July 2019
भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे!
माझ्या अलिकडच्या लिखाणावरून मी मराठी भाषा व त्यातील प्रादेशिक चित्रपट द्वेष्टा असल्याचा गैरसमज करून
घेऊ नये! (वास्तविक माझी आजवरची पत्रकारिता ही प्रामुख्याने मराठीतच झाली आहे आणि मराठी चित्रपटावर मी भरपूर लिखाण केले आहे)..मराठी सिनेमा वृद्धीसाठी वारंवार माझी लेखणी झुरलीये!
फक्त संकुचित मनोवृत्तीने आपल्याच भाषा-चित्रपटाचे अवडंबर माजवणे मला योग्य वाटत नाही..आणि याविषयीची सक्ती व बोलणे-कृतीतील विरोधाभास खटकतो! त्याच्या गुण-दोषांवर टीका-टिपणी व्हायला हवी.!
सर्व भाषा आणि त्यांतील कला नि चित्रपट यांचे वैश्विक स्तरावर व्यापक अवलोकन व्हावे..आणि कुठल्या भाषेत कुणाला कसे व्यक्त व्हावे वाटते याचे सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हीच इच्छा!
- मनोज कुलकर्णी
Monday, 8 July 2019
आनंदयात्री कवि!
![]() |
कवि बा. भ. बोरकर. |
ओलावल्या लोचनांनी.. भेटे आकाश सागरा.!"
सारख्या रोमांचकारी काव्यपंक्ती लिहिणारे..'पद्मश्री' बा. भ. बोरकर यांची आज ३५ वी पुण्यतिथी!
![]() |
| कवि बा. भ. बोरकर. |
"मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणे गळले हो...
जीवन त्यांना कळले हो.!"
असे त्यांचे मोलाचे शब्द मार्गदर्शक वाटतात..!
त्यांना भावपूर्ण आदरांजली.!!
- मनोज कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)
















