अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी!
'मनोरंजन' संस्थेचे संचालक आणि स्नेही मोहन कुलकर्णी यांचे आकस्मित निधन हे धक्कादायक नि दुःखदायी आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात नाट्यव्यवस्थापन, विविध कार्यक्रमांचे आयोजन व निर्मितीही करणाऱ्या 'मनोरंजन' या अग्रणी संस्थेची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत होते.
चित्रपट पत्रकारितेतील माझे कार्य व लिखाण याबाबत त्यांना आस्था होती. या क्षेत्रातील घडामोडी आणि चित्रपट महोत्सवांतील विशेष यांविषयी आमच्या चर्चा होत. २००२ साली माझ्या 'चित्रसृष्टी' प्रकाशन समारंभाचे व्यवस्थापन त्यांनी सांभाळले.
माझ्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. भेट होई तेंव्हा आपुलकीच्या भावनेतून त्यांचा संवाद असे.
त्यांना माझी भावांजली!
- मनोज कुलकर्णी

No comments:
Post a Comment