- मनोज 'मानस रूमानी'
माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Thursday, 6 July 2023
Friday, 9 June 2023
![]() |
| संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आदरणीय..लता मंगेशकर आणि सुलोचनाबाई! |
"गडनी, सजनी..
गडनी सजनी गं.."
भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) मधील हे नणंद-भावजय यांच्या ऋणानुबंधांचं गाणं!..या ग्रामीण चित्रपटांत जयश्री गडकर यांच्याबरोबर ही "मायेची वयनी" साकार केली होती..अर्थात सुलोचनाबाईंनी!
भालजींचेच ('योगेश' नावाने) हे गीत लता मंगेशकर यांनी स्वतःच्याच ('आनंदघन') संगीतांत भावोत्कटतेनं गायलेय!
सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी, चित्रपटसृष्टीत एकाच ठिकाणी लता दीदीं पाठोपाठच कारकीर्द सुरु झालेल्या सुलोचना दीदी यांचे त्यांच्याशी स्नेहबंध जुळले ते कायमचेच! आता हा दैवयोग म्हणावा की काय, मागच्या वर्षी लताजी हे जग सोडून गेल्या आणि पाठोपाठ या वर्षी सुलोचनाजी ही गेल्या!
संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आपल्या ह्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचे असे आपल्याला सोडून जाणे हे काहीसे वरील गीतातील "आसवांची गंगा वाहते.." शब्दांप्रमाणेच भावुक करणारे!
माझे भाग्य की मला वंदनीय असणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे (माझ्या 'चित्रसृष्टी' संदर्भात) मला जिव्हाळापूर्ण कौतुक लाभले!!
त्यांना माझी नम्र सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 14 May 2023
"देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे..
जीवन देई मम बाळाला.!"
मातेचे असे उत्कट भाव पडद्यावर व्यक्त झाले होते वात्सल्यमूर्ती सुलोचनाबाई यांच्या रूपात!
भावकवी पी. सावळाराम यांचे हे हृदयस्पर्शी गीत वसंत देसाई यांच्या संगीतात गायले होते आशा भोसलेंनी!
साने गुरुजी यांच्या हळव्या लेखणीतून आलेल्या कथेवरील हा चित्रपट होता यशवंत पेठकर यांचा 'मोलकरीण' (१९६३). साठ वर्षें होऊन गेली यास...पण मराठी रुपेरी पडद्यावरील मातृवात्सल्य आठवताना हेच भावुक गीतदृश्य समोर येते!
फार पूर्वी रेडिओवर माझ्या संहितेवर मी सादर केलेल्या मातृविषयक कार्यक्रमात हे गाणे प्रथम होते!
कालांतराने माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकासाठी आदरणीय सुलोचनाबाईची मी घेतलेली मुलाखत अविस्मरणीयच!!
या मातृदिनी शुभेच्छा!!!
- मनोज कुलकर्णी
Friday, 12 May 2023
Sunday, 30 April 2023
Saturday, 22 April 2023
Wednesday, 29 March 2023
Monday, 6 February 2023
भाग्यशाली मी!
गान सरस्वती यांच्या दरबारात..
जीवनातील असा हा सोनेरी क्षण!
आपलेपणाने झालेली सुरीली बात,
जीवन संगीताने भारावलेला क्षण!
- मनोज 'मानस रूमानी'
(माझा 'चित्रसृष्टी' संगीत विशेषांक स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर जी यांना दाखवल्यावर कौतुकाने त्या पाहतानाचा सोनेरी क्षण आठवत...त्यांस प्रथम स्मृतिदिनी माझी ही विनम्र सुमनांजली!)
- मनोज कुलकर्णी
Friday, 3 February 2023
रौप्यमहोत्सवी..सत्कार क्षण!
'९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर आठवलेला हा क्षण!
एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्री. ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा' पुरस्काराने माझा सत्कार झाला होता!
यास पंचवीस वर्षे होऊन गेली!!
- मनोज कुलकर्णी






