Sunday, 25 May 2025

पुरोगामी महाराष्ट्रात विवाहितेवर अत्याचार, आत्महत्या, लेकरू पोरके होणे हे अत्यंत दुःखदायक!

तीव्र निषेध!!

- मनोज कुलकर्णी

Saturday, 3 May 2025

झाकोळलेलं आभाळ निरभ्र होईल
चंद्र नि चांदण्यांचा खेळ सुरु होईल

- मनोज 'मानस रुमानी'

Monday, 31 March 2025

नव वर्ष..विचार!!

चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!


'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!

धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!


- मनोज 'मानस रूमानी'

Thursday, 20 March 2025


"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा..."


ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!..(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)
चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!


श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत आर्तपणे गायले होते लता मंगेशकर यांनी..'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!

योगायोगाने आज गबाले यांची जयंती आहे आणि अलीकडेच त्यांची जन्मशताब्दी झाली! आमचा दोघांचा जन्मदिवस (आज) २० मार्च या एकाच तारखेस! हे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!

माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास गबाले अध्यक्ष म्हणून आले!..मी त्यांचा सत्कार करतानाचे वरील छायाचित्र!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Friday, 14 March 2025

'गांधी विचार साहित्य संमेलन', पुणे येथे अलीकडेच (महात्मा गांधी यांचे पणतू व लेखक)..
श्री. तुषार गांधी यांची भेट झाली!

- मनोज कुलकर्णी


Wednesday, 12 March 2025

अडथळा येत नसतो प्रेमात भाषेचा..
डोळ्यांतुन व्यक्त होते ते शब्दांविना!

- मनोज 'मानस रूमानी'

Wednesday, 12 February 2025

नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या 'विश्व मराठी संमेलन' मध्ये लोककवी व ('काया मातीत मातीत' प्रसिद्ध) गीतकार डॉ. विठ्ठल वाघ यांची भेट झाली!

अलीकडेच वयाची ऐंशी पूर्ण केलेल्या त्यांना शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
(मानस रुमानी)

Tuesday, 14 January 2025

समता, बंधुता, मानवता प्रिय..
एक आहोत आपण सर्व भारतीय!

- मनोज 'मानस रुमानी'

 (मनोज कुलकर्णी)

Monday, 28 October 2024

'ग़ज़लशुदा' या श्री. दत्तप्रसाद रानडे यांच्या कालच्या चांगल्या कार्यक्रमानंतर त्यांची झालेली भेट!

- मनोज कुलकर्णी
(मानस रुमानी)

Tuesday, 8 October 2024

"मराठी पाऊल पडते पुढे.."

आपल्या मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर हे गीत अभिमानासह पुनःश्च मनात रुंजी घालू लागले!

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) चित्रपटासाठी कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेल्या ह्या गीतास संगीत दिले आहे आनंदघन म्हणजेच श्रेष्ठतम लता मंगेशकर यांनी! त्यांच्यासह मीना खडीकर, उषा मंगेशकर, प. हृदयनाथ मंगेशकर व हेमंत कुमार यांनी हे गायले आहे.

विलक्षण स्फूर्तिदायी आहे हे गीत!

- मनोज कुलकर्णी

आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची काहींना खोड़ असते. यामुळे आपल्या करिअर मध्ये व्यत्यय येतो. अशां (मुख्य नातलगां) पासून दूर राहावे!

समाजकारणाचे (भ्रष्ट) राजकारण झाले!
राजकारणाचे (खेळी) सत्ताकारण झाले!
जनसामान्यांचे (फसून) ध्रुवीकरण झाले!

- मनोज कुलकर्णी
(मानस रूमानी)

एक विचार!

सर्पमित्र, व्याघ्रमित्र असे उपक्रम वारंवार वाचायला, पाहायला मिळतात..ठीक आहे!
पण हे फक्त हिंस्र प्राण्यांबाबतच घडताना दिसते..निरुपद्रवी, गरीब व आनंद देणाऱ्या (उदा. ससा, हरीण सारख्या) प्राण्यांबाबत होतानाचे ऐकिवात नाही!
निदान माणसासाठी तरी 'मानवमित्र' उपक्रम असल्याचे कळल्यास आनंद होईल!

- मनोज कुलकर्णी