Wednesday 27 June 2018

प्रतिभाशाली संगीतकार श्रीकांतजी ठाकरे!
"शोधिशी मानवा राऊळी मंदिरी..
नांदतो देव हा आपुल्या अंतरी..!"

आवडते गायक मोहम्मद रफींनी मराठीत गायलेले गाणे म्हणून लगेच आठवणारे हे अवीट गोडीचे अर्थपूर्ण गीत संगीतबद्ध केले होते श्रीकांतजी ठाकरे यांनी...त्यांचा आज जन्मदिन!

व्यंगचित्रकार, पत्रकार आणि व्यासंगी समीक्षक असलेले श्रीकांतजी हे व्हायोलिनही वाजवीत..त्यामुळे संगीताकडे त्यांचा ओढा हा स्वाभाविकपणे होता! सरधोपट लोकप्रिय संगीतापेक्षा वेगळे असे त्यांचे अभिजात संगीत होते आणि त्यावर काहीसा उत्तर भारतीय संगीताचा प्रभाव होता..त्यानुरूप रागदारीत त्यांच्या संगीतरचना असत..उदाहरणादाखल मिश्र भैरवीत त्यांनी केलेले व शोभा गुर्टू यांनी गायलेले "उघड्या पुन्हा जहाल्या.."
गायक मोहम्मद रफ़ी व संगीतकार श्रीकांतजी ठाकरे!

त्यांच्या आग्रहा- खातरच रफीसाहेब मराठीत गायले. यात वंदना विटणकर यांची त्यांनी सुमधूर गायलेली "तुझे रूप सखे गुलज़ार असे.." आणि "विरले गीत कसे..?" ही भावगीते अविस्मरणीयच!

अगदी मोजक्याच मराठी चित्रपटांस श्रीकांतजी ठाकरे यांनी संगीत दिले. सुमारे वीस वर्षांपूर्वी अशाच एका चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांनी पुण्यातील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांबरोबर बातचीत केली होती. त्यांची ती संगीतमय मैफल अजूनही आठवतेय!

त्यांस ही विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी, पुणे]

No comments:

Post a Comment