'ग़ज़लशुदा' या श्री. दत्तप्रसाद रानडे यांच्या कालच्या चांगल्या कार्यक्रमानंतर त्यांची झालेली भेट!
माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Tuesday, 8 October 2024
"मराठी पाऊल पडते पुढे.."
आपल्या मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर हे गीत अभिमानासह पुनःश्च मनात रुंजी घालू लागले!
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) चित्रपटासाठी कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेल्या ह्या गीतास संगीत दिले आहे आनंदघन म्हणजेच श्रेष्ठतम लता मंगेशकर यांनी! त्यांच्यासह मीना खडीकर, उषा मंगेशकर, प. हृदयनाथ मंगेशकर व हेमंत कुमार यांनी हे गायले आहे.
विलक्षण स्फूर्तिदायी आहे हे गीत!
- मनोज कुलकर्णी
एक विचार!
सर्पमित्र, व्याघ्रमित्र असे उपक्रम वारंवार वाचायला, पाहायला मिळतात..ठीक आहे!
पण हे फक्त हिंस्र प्राण्यांबाबतच घडताना दिसते..निरुपद्रवी, गरीब व आनंद देणाऱ्या (उदा. ससा, हरीण सारख्या) प्राण्यांबाबत होतानाचे ऐकिवात नाही!
निदान माणसासाठी तरी 'मानवमित्र' उपक्रम असल्याचे कळल्यास आनंद होईल!
- मनोज कुलकर्णी
Tuesday, 26 March 2024
Monday, 25 March 2024
Friday, 8 March 2024
Thursday, 24 August 2023
"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी..."
हे तितक्याच भावोत्कटपणे पडद्यावर साकार करणाऱ्या, अभिजात मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखदायीच!
रमेश देव-सीमा देव या दिग्गज कलाकार दांपत्याशी झालेली भेट आज आठवते!!
त्यांस सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 6 August 2023
![]() |
| निसर्गकवी ना. धो. महानोर. |
प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचे निधन झाल्यावर त्यांचे हे काव्य त्यांच्याच आवाजात मनात रुंजी घालू लागले..आणि मन सुन्न झाले!
'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी', 'पक्ष्यांचे लक्ष थवे' असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा गंध घेऊन आली!
विशेषत्वानं आठवतं ते जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटीलने अप्रतिम साकार केलेलं..
"नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'
'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!..तेही नुकतेच हे जग सोडून गेले!
'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार महानोर यांना लाभले! 'मराठी साहित्य संमेलना'चे ते अध्यक्षही झाले!
त्यांच्या काव्यवाचनाच्या वेळी त्यांची झालेली भेट आठवते!!
त्यांना भावपूर्ण पुष्पांजली!!
- मनोज कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)





