गदिमांस वंदन!
श्रेष्ठ लेखक-कवी-गीतकार-अभिनेते व पटकथाकार..'पद्मश्री' प्राप्त ग. दि. माडगुळकर! |
त्यांना हे जग सोडून आता ४० वर्षं होऊन गेली!
तरुण तडफदार लेखक ग. दि. माडगुळकर! |
मराठी चित्रपटांच्या (विशेषतः दिग्दर्शक राजा परांजपे, संगीतकार सुधीर फडके व गदिमा ह्या प्रसिद्ध त्रिकुटाच्या) सुवर्ण काळात सुमारे १५७ चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आणि विविध असंख्य अर्थपूर्ण गीतेही लिहिली..त्याचबरोबर २३ हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी लिहिले!
"दैव जाणिले कुणी.." व "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.." सारखी सर्वकालीन भावार्थ असणारी आणि "अजब तुझे सरकार.." सारखी समकालीन संदर्भ असणारी त्यांची गीते अविस्मरणीय!
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी
मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील त्रिकुट! (दिग्दर्शक राजा परांजपे,
संगीतकार सुधीर फडके व
लेखक ग. दि. माडगुळकर)
No comments:
Post a Comment