Monday, 31 March 2025

नव वर्ष..विचार!!

चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!


'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!

धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!


- मनोज 'मानस रूमानी'

Thursday, 20 March 2025


"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा..."


ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!..(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)
चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!


श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत आर्तपणे गायले होते लता मंगेशकर यांनी..'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!

योगायोगाने आज गबाले यांची जयंती आहे आणि अलीकडेच त्यांची जन्मशताब्दी झाली! आमचा दोघांचा जन्मदिवस (आज) २० मार्च या एकाच तारखेस! हे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!

माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास गबाले अध्यक्ष म्हणून आले!..मी त्यांचा सत्कार करतानाचे वरील छायाचित्र!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Friday, 14 March 2025

'गांधी विचार साहित्य संमेलन', पुणे येथे अलीकडेच (महात्मा गांधी यांचे पणतू व लेखक)..
श्री. तुषार गांधी यांची भेट झाली!

- मनोज कुलकर्णी


Wednesday, 12 March 2025

अडथळा येत नसतो प्रेमात भाषेचा..
डोळ्यांतुन व्यक्त होते ते शब्दांविना!

- मनोज 'मानस रूमानी'