Friday, 22 August 2025

नातीही आजकाल सोशल नेटवर्क पुरती मर्यादित राहिलीत!
 
कालाय तस्मै नमः !!

- मनोज कुलकर्णी

Friday, 8 August 2025


क्षणिक दिसते, लोभस हसते
नीरागस भासते सौंदर्य तिचे!
गूढ या परिकथेतील ललनेचे
'मानस' तुला का ठाऊक नसे!

- मनोज 'मानस रुमानी'
(मनोज कुलकर्णी)

Thursday, 12 June 2025

स्मरण पु.लं. चे!


लोकप्रिय साहित्यिक व 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु. ल. देशपांडे यांचा आज
२५ वा स्मृतिदिन!


कलेच्या बहुतांश माध्यमांतून पु.लं.चा मुक्त संचार होता.

त्यांचा कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन-संगीत व अभिनित..'गुळाचा गणपती' (१९५३) हा मराठी चित्रपट अविस्मरणीय!


पु.लं.ना प्रत्यक्ष ऐकणे ही एक पर्वणी असे..एका परिसंवादात बोलताना ते म्हणाले होते, "लेखक-दिग्दर्शक संबंध हे सासू-सुनेच्या संबंधा इतकेच नाजूक असतात!''

त्यांना भेटल्याचे सुखद क्षण आठवतायत!

त्यांना विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday, 11 June 2025


स्मरण साने गुरुजींचे!

'श्यामची आई' सारखी मातेची महती सांगणारी हृदयस्पर्शी, संस्कारक्षम साहित्यकृती निर्मिणारे "खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे!" सारखा संदेश देणारे..समाजवादी विचारवंत आणि थोर साहित्यिक साने गुरुजी यांस ७५व्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Monday, 2 June 2025

अंधश्रद्धेवर आधारित मराठी चित्रपट, वेब सिरीज आदी निघणे व त्यांत विचारशील कलाकारांनी काम करणे हे खेदजनक!

- मनोज कुलकर्णी 

Sunday, 25 May 2025

पुरोगामी महाराष्ट्रात विवाहितेवर अत्याचार, आत्महत्या, लेकरू पोरके होणे हे अत्यंत दुःखदायक!

तीव्र निषेध!!

- मनोज कुलकर्णी

Saturday, 3 May 2025

झाकोळलेलं आभाळ निरभ्र होईल
चंद्र नि चांदण्यांचा खेळ सुरु होईल

- मनोज 'मानस रुमानी'

Monday, 31 March 2025

नव वर्ष..विचार!!

चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!


'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!

धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!


- मनोज 'मानस रूमानी'

Thursday, 20 March 2025


"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा..."


ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!..(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)
चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!


श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत आर्तपणे गायले होते लता मंगेशकर यांनी..'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!

योगायोगाने आज गबाले यांची जयंती आहे आणि अलीकडेच त्यांची जन्मशताब्दी झाली! आमचा दोघांचा जन्मदिवस (आज) २० मार्च या एकाच तारखेस! हे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!

माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास गबाले अध्यक्ष म्हणून आले!..मी त्यांचा सत्कार करतानाचे वरील छायाचित्र!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Friday, 14 March 2025

'गांधी विचार साहित्य संमेलन', पुणे येथे अलीकडेच (महात्मा गांधी यांचे पणतू व लेखक)..
श्री. तुषार गांधी यांची भेट झाली!

- मनोज कुलकर्णी


Wednesday, 12 March 2025

अडथळा येत नसतो प्रेमात भाषेचा..
डोळ्यांतुन व्यक्त होते ते शब्दांविना!

- मनोज 'मानस रूमानी'

Wednesday, 12 February 2025

नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या 'विश्व मराठी संमेलन' मध्ये लोककवी व ('काया मातीत मातीत' प्रसिद्ध) गीतकार डॉ. विठ्ठल वाघ यांची भेट झाली!

अलीकडेच वयाची ऐंशी पूर्ण केलेल्या त्यांना शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
(मानस रुमानी)

Tuesday, 14 January 2025

समता, बंधुता, मानवता प्रिय..
एक आहोत आपण सर्व भारतीय!

- मनोज 'मानस रुमानी'

 (मनोज कुलकर्णी)